…आणि लाखोंचे बिल झाले हजारांवर! ‘सकाळ’चा दणका; महावितरण कारभाराचा भांडाफोड

सिडको (जि.नाशिक) : कोरोनाकाळामध्ये बंद असलेल्या एका शैक्षणिक ॲकॅडमीला महावितरण विभागाने लाखो रुपयांचे बिल आकारल्याबाबत ‘सकाळ’ने या विषयावर आवाज उठविला तसेच या संदर्भात ‘सकाळ’ने महावितरण कारभाराचा भांडाफोड केला होता..

...आणि लाखोंचे बिल झाले हजारांवर! 

सिडकोतील संभाजी स्टेडियमशेजारी गरुडझेप नावाची स्पर्धा परीक्षासंदर्भाची ॲकॅडमी आहे. ॲकॅडमीतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. कोरोनाकाळात संबंधित ॲकॅडमी पूर्णपणे बंद होती. असे असतानाही या ॲकॅडमीला महावितरण विभागाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सात लाख ३१ हजार ९४० रुपयांचे वीज बिल आकारले होते. या संदर्भात ‘सकाळ’ने महावितरण कारभाराचा भांडाफोड केला. त्यानुसार नुकतेच महावितरण विभागाने योग्य ती चौकशी व वीजमीटर तपासणी करून संबंधित ॲकॅडमीचे बिल दुरुस्ती करून १९ हजार ४३० रुपये नव्याने पाठविले आहे. यामुळे ॲकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. सुरेश सोनवणे यांनी ‘सकाळ’चे आभार व्यक्त केले, तर महावितरण अधिकाऱ्यांनी बिल कमी करून दिल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

 ‘सकाळ’चा दणका; महावितरण कारभाराचा भांडाफोड

कोरोनाकाळामध्ये बंद असलेल्या एका शैक्षणिक ॲकॅडमीला महावितरण विभागाने लाखो रुपयांचे बिल आकारल्याबाबत ‘सकाळ’ने या विषयावर आवाज उठविताच संबंधित ॲकॅडमीचे बिल कमी केल्याने ॲकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. सुरेश सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

लॉकडाउनमध्ये गरुडझेप ॲकॅडमी पूर्णपणे बंद होती. असे असतानाही सात लाखांच्या पुढे महावितरणने वीजबिल आकारणी केली. याबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच संबंधित अधिकाऱ्यांनी वीजबिल व मीटरची तपासणी केली. त्यानंतर बिल कमी करून मिळाले. ‘सकाळ’चे खूप खूप धन्यवाद! 
-डॉ. सुरेश सोनवणे, संचालक, गरुडझेप ॲकॅडमी, नाशिक