Site icon

आता ड्रोनची नाशिक शहरावर करडी नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आपत्कालीन परिस्थितीत ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. या उपक्रमामध्ये नाशिक स्मार्ट सिटीतर्फे ड्रोन कॅमेर्‍यांचे प्रशिक्षण देण्यात आले. इम्प्लिमेंटेशन अँड मेन्टेनन्स ऑफ इंटिग्रेटेड सर्व्हेलन्स अँड सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म फॉर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर या प्रकल्पाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले.

यामध्ये महापालिकेच्या अग्निशामक दलातील कर्मचारी व पोलिसांचा समावेश होता. प्रशिक्षणार्थींना ड्रोन कशा पद्धतीने वापरायचा, त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले पाहिजे, ड्रोन वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थींची परीक्षा घेऊन त्यांना ड्रोन वापरण्याचा परवाना प्रदान करण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून पूरपरिस्थितीचे निरीक्षण, आगामी काळात कुंभमेळ्याचे क्राउड मॉनिटरिंग, विविध ठिकाणांचे अचूक मॅपिंग तसेच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबतच या प्रकल्पांतर्गत नाशिक शहरात 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, राजीव गांधी भवन, नाशिक महापालिका व तसेच सहा विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे.

* प्रकल्पाच्या अनुषंगाने स्मार्ट सिटीतर्फे दोन ड्रोन कॅमेरे महापालिका व दोन ड्रोन कॅमेरे पोलिस विभागाला देण्यात येणार आहेत.
* नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे तसेच आयटी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल तडकोड, उपमहाव्यवस्थापक सुधीर गोराडे आणि ड्रोन कॅमेर्‍यांचे प्रशिक्षण घेणारे सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post आता ड्रोनची नाशिक शहरावर करडी नजर appeared first on पुढारी.

Exit mobile version