“आता तरी गेल्या घरी सुखी राहा!” मनसे नेते बाळा नांदगांवकरांनी फेसबुकद्वारे कोणास दिले प्रत्युत्तर?

नाशिक : मनसेचे पूर्वाश्रमीचे नेते आणि नुकतेच भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आलेले वसंत गीते मनसेत पुन्हा प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र वसंत गीते यांनी मनसेच्या तीन मोठ्या नेत्यांवर आरोप करत मनसेप्रवेशाचे वृत्त फेटाळले होते. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वसंत गिते यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षात परतण्याचं सूचवलं होतं. मात्र, मला ज्या तीन नेत्यांमुळे मनसेतून बाहेर पडावं लागलं, त्या नेत्यांसोबत काम करावं का? असा प्रश्न गिते यांनी विचारला. त्यावर आता मनसे नेते बाळा नांदगावकरांनी फेसबूकच्या माध्यमातून  प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले नांदगावकर...

 

 

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकमध्ये (ता.८) काल राजकीय हालचाली झालेल्या दिसल्या.  याच दरम्यान नुकतेच शिवबंधन बांधलेले गिते हे मनसे बाबत म्हणाले होते. त्यांचा रोख पूर्णपणे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याकडेच होता. नाशिकमध्ये मनसेला आपण वाढवलं, पक्षाचं काम मोठं केल. पण, भविष्यात आपल्याला स्पर्धक निर्माण होईल, म्हणून काही जणांनी मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडलं, असे यावेळी गिते यांनी म्हटलं होतं. वसंत गीतेच्या या वक्तव्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी देखील फेसबुकद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.

<