आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी ‘मातोश्री’वर यावे

आदित्य ठाकरे यांनी घेतले काळाराम मंदिर दर्शन,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
आमदार सुहास कांदे ’मातोश्री’वर भेटायला आले, तर त्यांना भेटू. पण, त्यांनी यावे, असे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्या नाशिकमधील भेटीला एक प्रकारे नकारच दर्शविला. ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 22) सकाळी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त सुधीर पुजारी, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

आ. ठाकरे यांना पत्रकारांनी आ. कांदे यांच्या ’माझं काय चुकलं’ या भूमिकेविषयी विचारले असता ’ते’ आले, तर त्यांना निश्चित भेटू, पण त्यांनी मातोश्रीवर यावे, ’मातोश्री’चे दरवाजे कधीच कुणासाठी बंद नव्हते आणि नाहीत, असे सांगत आ. कांदे यांना नाशिकमध्ये भेट नाकारली. दरम्यान, प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी मी नेहमी येत असतो. वेगळे काही मागितले नाही. देशातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना केल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

 

The post आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी 'मातोश्री'वर यावे appeared first on पुढारी.