![आदित्य ठाकरे](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2022/03/01143526/aaditya-thackeray.jpg)
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी पर्यटनमंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे प्रथमच नाशिकच्या दौर्यावर येत असून, त्यांची शिवसंवाद यात्रा येत्या गुरुवारी (दि.21) नाशिकमध्ये येत आहे. या दौर्यामध्ये ते नाशिकमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
त्याचबरोबर मालेगाव आणि नांदगाव या दोन मतदारसंघांतील चाचपणीही ते करणार आहेत. शिंदे गटाकडून एकामागोमाग एक धक्के बसत असल्याने आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्याद़ृष्टीने ते नाशिक जिल्ह्याच्या दौर्यावर गुरुवारी (दि.21) येत आहेत.
गुरुवारी (दि.21) सायंकाळी 6 वाजता ते नाशिकला येतील. सायंकाळी बैठक तसेच पदाधिकार्यांची भेट घेतील. त्यानंतर दुसर्या दिवशी दिंडोरी, येवला, निफाड, मनमाड, नांदगाव आणि दाभाडी या तालुक्याला भेटी देऊन तेथील पदाधिकार्यांशी चर्चा करतील. माजी मंत्री दादा भुसे यांच्या तसेच आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण
- Nashik : नांदगाव रेल्वेस्टेशनवर माथेफिरुचा धिंगाणा ; पोलीस अधिकाऱ्यावर चाकुचा हल्ला
The post आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात appeared first on पुढारी.