आदिवासी विकास भवनातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमध्ये वाढ; वाढली चिंता 

नाशिक : आदिवासी विकास भवनातील अपर आदिवासी आयुक्तालयातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अपर आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकाऱ्यांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले.

एका अधिकाऱ्यासही कोरोनाची लागण

सुमारे १४ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मंगळवारी (ता. २) पुन्हा सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आणखी पाच जण कोरोनाबाधित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपर आयुक्त कार्यालयातील कोरोनाबाधित अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अपर आयुक्त कार्यालयासह प्रकल्प कार्यालयातील एका अधिकाऱ्यासही कोरोनाची लागण झाली आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

आदिवासी विभागाकडे लक्ष
आदिवासी विकास भवनात कोरोनाने शिरकाव केल्याने आयुक्त कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे. आता पुन्हा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने तसेच विधानसभेचे अधिवेशनही सुरू असल्याने आदिवासी विभागाकडून काय निर्णय घेण्यात येईल, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.  

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा