नाशिक : नाशिक जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेला रुग्णसंख्येतील घटीचा आलेख या आठवड्याअखेरही कायम राहिला. या आठवड्यात तब्बल ३४ ने रुग्णांची संख्या घटली आहे. त्याचसोबत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांच्या पुढे जात आहे. हे सगळे सकारात्मक परिणाम बघता, नाशिकची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.
रुग्णांत सातत्याने घट
दोन हजारांहून अधिक कोरोनामृत्यू झालेल्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव काही आठवड्यांपासून कमी होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एक लाख दहा हजार ८५५ कोरोनाबाधितांना आतापर्यंत घरी सोडले असून, सध्या एक हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्यात ३४ ने घट झाली आहे. जिल्ह्यात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ६३, चांदवड २४, सिन्नर ८४, दिंडोरी २१, निफाड ५८, देवळा ७, नांदगाव २७, येवला २२, त्र्यंबकेश्वर १४, पेठ ७, कळवण १२, बागलाण १८, इगतपुरी ३, मालेगाव ग्रामीण १८ अशा एकूण ३७८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महापालिका क्षेत्रात ७७७, मालेगाव महापालिका क्षेत्रात १३२, तर जिल्ह्याबाहेरील सात अशा एकूण एक हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के
आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख १४ हजार १८४ रुग्ण आढळले. बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९६.४२, नाशिक शहरात ९७.६२, मालेगावमध्ये ९३.४५ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.८ इतके आहे.
दोन हजार जणांचा मृत्यू
नाशिक ग्रामीणमध्ये ८०१, नाशिक महापालिका क्षेत्रातून एक हजार आठ, मालेगाव महापालिका क्षेत्रातून १७६ व जिल्ह्याबाहेरील ५० अशा एकूण दोन हजार ३५ रुग्णांचा मृत्यू झाला.
दृष्टिक्षेपात
- १ लाख १० हजार ८५५ रुग्ण झाले पूर्ण बरे
- जिल्ह्यात सध्या १ हजार २९४ बाधित रुग्ण
- बाधित बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के
हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
तारीख अॅक्टिव्ह संख्या संख्येतील घट-वाढ
१२ जानेवारी १,४०८ - १८१
१३ जानेवारी १,४३० + २२
१४ जानेवारी १,४२० - १०
१५ जानेवारी १,३६० - ६०
१६ जानेवारी १,३७८ + १८
१७ जानेवारी १,३१५ - ६३
१८ जानेवारी १,३०७ - ०८
१९ जानेवारी १,३२८ + २१
२० जानेवारी १,२९४ - ३४
हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे, हे निश्चितीच आशादायी चित्र आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना कोरोनाबाधितांची घटती संख्या ही कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक