”आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!” भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा अनोखा प्रयोग; पाहा VIDEO

गणूर (जि.नाशिक) : 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. कसे ते पाहा....

भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा जगातील पहिला प्रयोग

कायमचं आपल्या कलेतून समाजप्रबोधनात जमेल त्या योगदानाचं देणं देणारे चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.

 चित्ररेखाटन, फलकलेखन, रांगोळी ह्या अंगी असलेल्या कलेतून समाजप्रबोधनाचं काम करणारे कलाशिक्षक म्हणून राज्यभरात देव हिरे यांची ओळख आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे कलाशिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने कला सादरीकरनातून वेगळा संदेश देण्याची त्यांची पद्धत सर्वाना भावणारी असते. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

चांदवडच्या देव हिरेंच महामानवाला अनोखं अभिवादन!

१४ एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देव हिरे यांनी सादर केलेल्या रांगोळीचं वेगळपण अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांच्या कार्यातून झालं असल्याने, 'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' अशा अनेक लोकगीतातून बाबासाहेबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेलीय, पण खरोखरच बाबासाहेबांची सही भाकरीवर काढणं शक्य आहे का याच विचारातून फक्त सहीच नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबच ह्या अवलियाने रांगोळीतुन साकारले आहेत. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

संयम व सातत्यातून रांगोळी

आठ इंच व्यास असलेल्या बाजरीच्या भाकरीवर सहा इंच आकारात पाच तासांचा संयम व सातत्यातून त्यांनी ही रांगोळी साकारली आहे, त्यांच्या या वेगळ्या प्रयोगात जयश्री देविदास हिरे.यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभलीय.

खरं तर आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! हे लोकप्रिय गीत ऐकूनच मला ही कल्पना सुचली. या अगोदर भाकरीवर पोर्टेट रांगोळी साकारण्यात आली आहे का याबाबतचा इंटरनेटवर कसून शोध घेऊन हा प्रयोग या अगोदर कुणी केला असल्याचं दिसलं नाही, राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेरील देखील अनेक कलाशिक्षकाशी याबाबत संवाद साधला सर्वांकडून हा पहिलाच प्रयोग ठरेल अशीच उत्तरं मिळालीत. मी लगेचच बाजरीची भाकर तयार करून रांगोळी काढायला सुरुवात केली अन पाच तासांच्या प्रयत्नांतून ती साकारली देखील गेली. अनेक मित्रांचा, कलाशिक्षकांचा आग्रह आहे की या प्रयोगाची नोंद होईल त्यामुळे तशा अर्थाने येत्या महिन्यात नोंदणी करणार आहोत.-देव हिरे
कलाशिक्षक चांदवड