आमदार अमरीश भाई पटेल : अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून शिरपूरचे देशभरात नावलौकिक

आमदार अमरिशभाई पटेल www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था निर्माण करून तालुक्यातील विद्यार्थी देशभरात व जगभरात नावलौकिक प्राप्त करत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

शिरपूर तालुक्यातील बलकुवे गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळाप्रसंगी पटेल बोलत होते. यावेळी सरपंच प्रदिप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश सोहळा माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते पार पडला. व्यासपीठावर आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेश पटेल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा बँक संचालक प्रभाकर चव्हाण, भाजपाचे राहुल रंधे, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, बलकुवे सरपंच प्रदिप चव्हाण, पंचायत समिती माजी उपसभापती दिपक गुजर, पंचायत समिती विद्यमान उपसभापती विजय बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले की, गेल्या 35 ते 40 वर्षांपासून शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी झटत असून सर्वसामान्य जनता सुखी, संपन्न व्हावी म्हणून नेहमीच प्रयत्नशील आहोत. अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था निर्माण करून तालुक्यातील विद्यार्थी देशभरात व जगभरात नावलौकिक प्राप्त करत आहे, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शिरपूर पॅटर्न मार्फत ३०३ बंधाऱ्यांमार्फत भूगर्भातील पाणी पातळी वाढवली असून यापुढेही शंभर टक्के जमीन सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्नशील राहील. एस. व्ही. के. एम. संस्थेमार्फत 1 हजार बेडचे रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा मानस आहे. ज्या मार्फत गोरगरीब सर्वसामान्य जनतेला कमी खर्चात सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यात येईल. हे आपण पैशांसाठी करत नसून आर्थिक नुकसान सहन करुन सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी मनापासून प्रयत्नशील आहे. तालुक्याच्या विकासासाठी एकदिलाने प्रयत्न करुया. बलकुवे गावातील सरपंच तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून त्यांचे मनापासून स्वागत करतो. गावासह तालुक्याच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रविण शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post आमदार अमरीश भाई पटेल : अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून शिरपूरचे देशभरात नावलौकिक appeared first on पुढारी.