नाशिक, कळवण : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण आले असून दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होते आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह अगदी खेडो-पाडी या आंदोलनाची धग पोहचली आहे. मराठा आंदोलकांकडून मराठा नेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांवर रोष व्यक्त केला जातो आहे. अशातच आज आरक्षणासाठी कोल्हापूर फाटा कळवण येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी कळवण मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांचा शुभेच्छांचा बॅनर फाडला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत मराठा बांधवांनी रास्ता रोको करत निषेध नोंदवला. आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होता. दरम्यान रास्तारोकोमुळे पोलीस अधिकऱ्यांसह महसुलचे कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित होते. यावेळी पाळे येथील संतप्त मराठा आंदोलक प्रवीण पाटील यांनी आमदार नितीन पवार यांचा बॅनर फाडला.
हेही वाचा :
- Solapur News : मराठा आरक्षण : अक्कलकोट-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको
- Pimpri News : शहरात नारीशक्तीचा जागर
- रिंग रोड’च्या प्राथमिक आणि अंतिम सूचनेतील व्यवहार तपासण्याचे मंत्री दादा भुसे यांचे आदेश
The post आमदार नितीन पवारांचा बॅनर फाडला; मराठा आंदोलक आक्रमक appeared first on पुढारी.