आमदा-पळसन पुलावर ट्रॅक्टर उलटला; चालक शेतकऱ्याचा मृत्यू

सुरगाणा (नाशिक) :  तालुक्यातील आमदा-पळसन पुलावर नवीन ट्रॅक्टर उलटून चालक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टर बाजूला करून त्याला सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी सुरेश पांढुले यांनी मृत घोषित केले. 

चंद्रकांत योगीराज बागूल (वय ३५, रा. हस्ते) व यशवंत चंदर वाघमारे हे दोघे शनिवारी (ता. ६) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कामानिमित्त उंबरठाणकडे जात होते. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात चंद्रकांत बागूल याचा मृत्यू झाला. तर दुसरा ट्राॅलीत बसलेला यशवंत चंदर वाघमारे यास गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर पळसन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अपघाताची माहिती घेण्याचे काम पोलिस चंद्रकांत दवंगे, प्रभाकर सहारे यांच्याकडून सुरू होते.  

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल