आयटी पार्कसाठी राजूर बहूलात शंभर एकर जागा आरक्षित

हेमंत गोडसे,www.pudhari.news

देवळाली कॅम्प: पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात आयटी पार्कसाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन टप्प्यात शंभर एकर जागा नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथे आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. शासनाच्या या निर्णयामुळे आयटी पार्कचा मार्ग मोकळा झाला असून सुशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली. (Nashik News)

नाशिकला आयटी पार्क नसल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी पुणे, बंगळूर आदी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. नाशिक परिसरात आयटी पार्क असावा, अशी मागणी शैक्षणिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरांकडून खा. गोडसे यांच्याकडे सतत केली जात होती. शहर परिसरात विखूरलेल्या छोट्या आयटी कंपन्यासाठी एकाच छताखाली प्रशस्त जागेवर आयटी पार्क असावेत, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून खा. गोडसे यांनी प्रयत्न सुरू होते. यासाठी त्यांनी उद्योगमंत्री व संबंधित अधिकारी यांची अनेकदा भेट घेत आयटी पार्कचा पाठपुरावा केला होता.

मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. त्यात आयटी पार्कसाठी जागा आरक्षित करण्याच्या मुद्द्यावर खा. गोडसे आणि सचिवांशी चर्चा करून नाशिक तालुक्यातील राजूर बहूला शिवारात दोन टप्प्यात शंभर एकर जागा आरक्षित ठेवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. बैठकीला एमआयडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, विकास आयुक्त कुशवाह, एमआयडीसीचे सह कार्यकारी अधिकारी मलिक नेर, उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post आयटी पार्कसाठी राजूर बहूलात शंभर एकर जागा आरक्षित appeared first on पुढारी.