आरक्षण टिकविण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी उभे राहा; ओबीसी नेत्यांचा सूर

सिन्नर (नाशिक) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीतर्फे तहसील कचेरीवर ओबीसी समाजाचे आरक्षण टिकविण्यासाठी शुक्रवारी (ता.२७) सकाळी अकराला तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

भुजबळांच्या पाठीशी उभे राहा

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात प्रथम ओबीसी समाजाला आरक्षण दिले, परंतु दुर्दैवाने ओबीसी समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ४० वर्षे वाट पाहावी लागली. सुमारे ४०० छोट्या-मोठ्या जातीसमूहांना अठरापगड जातींसह बलुतेदार, आलुतेदार यांना न्याय देण्यासाठी ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांनी अथक प्रयत्न केले. मात्र आता तेच धोक्यात आलेले असल्याने आरक्षण टिकविण्यासाठी छगन भुजबळांच्या पाठीशी उभे राहा, असा सूर ओबीसी नेत्यांनी आळवला. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, बाळासाहेब वाघ, उदय सांगळे, राजेंद्र जगझाप, नामदेव लोंढे, डॉ. विष्णू अत्रे, छबू कांगणे, चंद्रकांत वरंदळ, दत्ता वायचळे आदी उपस्थित होते. तहसीलदार राहुल कोताडे यांना या वेळी निवेदन देण्यात आले. बाळासाहेब कर्डक, उदय सांगळे, अंबादास खैरे, चंद्रकांत वरंदळ, बाळासाहेब वाघ आदींनी मार्गदर्शन केले. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

माजी नगरसेवक किरण कोथमिरे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जगझाप यांनी आभार मानले. मोर्चात रवींद्र काकड, विष्णुपंत बलक, किरण लोणारे, संजय काकड, संदीप भालेराव, संग्राम कातकाडे, दत्ता गोळेसर, डॉ. संदीप लोंढे, आशिष फुलसुंदर आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.