‘आरटीओ’मध्ये ई-साईन सेवा! आता अर्जदाराचा ‘हा’ जरा ताण कमी होणार

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन सेवेशी निगडित अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ई-साईन सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत अर्जदारांना सेवेचा लाभ घेण्याचा पर्याय ऐच्‍छिक असेल. तर ई-साईन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या अर्जदारांना अनुज्ञप्ती अर्ज करताना कागदपत्रे साक्षांकित करून कार्यालयात सादर करण्याची‍ आवश्‍यकता राहणार नाही. चाचणी आवश्‍यक असल्‍यास, त्‍यासाठी मात्र संबंधितांना आरटीओ कार्यालयात उपस्‍थित राहावे लागेल.

अर्जदाराला कागदपत्रे सादर करण्याचा ताण वाचणार 

यासंदर्भात परिवहन कार्यालयामार्फत राज्‍यभरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्‍या नावाने सूचना जारी केली आहे. यात म्‍हटले आहे, की परिवहन सेवेशी निगडित अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ई-साईन सेवा सुरू करण्यास शासनाने मान्‍यता दिली आहे. राज्‍यात आधार क्रमांकावर आधारित ई-साईन प्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी सीडीएसी यांच्‍या सहाय्याने विकसित केली आहे. राष्ट्रीय सूचना केंद्र यांच्‍या परिवहन संकेतस्‍थळाशी जोडलेले आहे. यानुसार अर्जदार स्‍वतःचा आधार क्रमांक नोंदविल्‍यानंतर त्‍यांनी अपलोड केलेले सर्व कागदपत्रे ई-साईन होऊन विभागास प्रणालीमार्फत सादर करण्यात येतील. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

अर्जाची प्रिंटची गरज नाही 

अर्जदाराला पुन्‍हा कार्यालयामध्ये कागदपत्रे साक्षांकित करून सादर करण्याची आवश्‍यकता राहणार नाही. तसेच, अर्जाची प्रिंट काढायची आवश्‍यकता नाही. सर्वप्रथम सारथीविषयक सेवांकरिता ई-साईन सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेणे हे अर्जदारास ऐच्‍छिक असून, प्रत्‍येक अर्जाकरिता दोन रुपये व जीएसटी असे शुल्‍क आकारले जाईल. अनुज्ञप्ती विषयक अर्ज व त्‍यासोबत जोडावयाचे सर्व कागदपत्रे ई-साईन करता येणार आहे.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना