आरटीओ : तीनचाकी वाहनांसाठी एमएच 15, जेए नवीन मालिका

आरटीओ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तीनचाकी वाहनांसाठी ‘एमएच 15, जेए’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी इच्छुकांनी गुरुवारी (दि.13) सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले.

तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेच्या राखीव आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी शासन नियमानुसार ठरावीक शुल्क विहित करण्यात आले आहे. या अनुषंगाने इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज गुरुवारी (दि.13) दिलेल्या वेळेत कार्यालयात जमा करणे अनिवार्य असेल. अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, वीजबिल, घरपट्टी यापैकी एक तसेच अर्जदाराचे फोटो, आधारकार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यापैकी एक साक्षांकित प्रत तसेच आधारलिंक मोबाइल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी शुल्काची रक्कम कोणत्याही राष्ट्रीयीकृत किंवा शेड्यूल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांच्या नावे भरणे आवश्यक आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा, असेही शिंदे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

The post आरटीओ : तीनचाकी वाहनांसाठी एमएच 15, जेए नवीन मालिका appeared first on पुढारी.