
धुळे : पुढारी वृत्तसेवा
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या परिचलन पध्दतीने झालेल्या बैठकीत नविन भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ऑटोरिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण दोन महिन्याच्या आत करणे अनिवार्य असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल कदम यांनी दिली.
या बैठकीत खटुआ समितीच्या अहवालानुसार ऑटोरिक्षा भाडेदर सुत्र विहित करण्याकरिता केलेल्या शिफारशीनुसार ऑटोरिक्षासाठी पहिल्या १.५ कि.मी. अंतरासाठी किमान देय भाडे २१ रुपयांवरून २७ रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. तर पुढील प्रत्येक १ कि.मी. साठी किमान देय भाडे १४ रुपयांवरून १८ रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. नविन भाडे दर निश्चित केल्याने ऑटोरिक्षांचे इलेक्ट्रॉनिक मीटर्सचे पुर्न: प्रमाणीकरण दोन महिन्याचे आत म्हणजेच 31 मे, 2023 पूर्वी करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीत मीटर पुर्न:प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा परवाना धारकांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ८६ अन्वये असलेल्या अधिकारात मीटर पुर्न: प्रमाणीकरणाची विहित मुदत समाप्तीनंतर प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी किमान एक दिवस तर कमाल 7 दिवस परवाना निलंबित करण्यात येईल. तथापि, कमाल परवाना निलंबन कालावधी 40 दिवसांचा असेल. तसेच परवाना निलंबनाऐवजी तडजोड शुल्क भरावयाचे असल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये व किमान 500 रुपये तथापि कमाल तडजोड शुल्क दोन हजारांपेक्षा अधिक असणार नाही. तरी सर्व ऑटोरिक्षा मालक ,चालक यांनी नोंद घेऊन विहित मुदतीत भाडेवाढीनुसार मीटरचे पुर्न:प्रमाणीकरण करून घ्यावे व वाहनावरील कारवाई टाळावी. असेही आवाहन कदम यांनी केले आहे.
हेही वाचा:
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी
- औरंगाबाद : विद्यापीठात परीक्षेचा गोंधळ संपेना; विद्यार्थ्यांनी दिली हॉलतिकीट विना परीक्षा
- Nashik Crime : दहिपुलावर दहशत माजविणाऱ्यांची काढली धिंड
The post आरटीओ : रिक्षाचालकांना मीटर्सचे पुर्न:प्रमाणीकरण करण्याचे आवाहन; अन्यथा परवाना होणार निलंबित appeared first on पुढारी.