आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी मागितली लाच; पोलिस हवालदारावर गुन्हा

नाशिक : सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीसांचे हे ब्रीदवाक्य..पण अशा काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे खाते बदनाम होते. गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांना जामीन मिळण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदाराने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 

तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे

अभोणा येथे दाखल झालेल्या एका गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदार यांच्यासह साथीदारांना अटक करून जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी पोलिस हवालदार यांनी २० हजारांची लाच मागितली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर ५ फेब्रुवारीस विभागाने सापळापूर्वी पडताळणी केली. त्यात  गांगोडे यांनी पंचांसमक्ष तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

पोलिस हवालदाराविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा 

गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांना जामीन मिळण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अभोणा (ता. कळवण) येथील पोलिस हवालदार परशराम गांगोडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना