सिन्नर (नाशिक) : वित्तीय संस्थांशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या आर्थिक गैरव्यवहार चौकशी यंत्रणेकडून दोन दिवसांपासून नाशिकमधील दोन संस्थांची चौकशी सुरू आहे. यात नाशिक शहरातील एक खासगी वित्तीय संस्था आणि सिन्नरमधील एका सहकारी संस्थेचा समावेश आहे.
चौकशी सत्रामुळे अनेकांचे धाबे दणाणले
आर्थिक अनियमितता आणि गुंतवणूकदारांचे हितरक्षण न करणाऱ्या संस्थांच्या विरोधात शासनस्तरावरून कारवाई करण्यात येते. यात संबंधित संस्थांच्या संचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात. नाशिक जिल्ह्यात गेल्या काळात दाखल झालेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांची पडताळणी उच्चस्तरीय तपास पथकाकडून सुरू असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यासंदर्भात प्रशासकीय स्तरावरून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात येत नसली तरी ही चौकशी केंद्राकडून की राज्याकडून होत आहे, याबाबत गुप्तता पाळली जात आहे. या चौकशी सत्रामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपासून या पथकाकडून दाखल गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत असून, संबंधित गुन्ह्यांच्या तपास अधिकाऱ्यांना जबाबासाठी पाचारण करण्यात आल्याचीही चर्चा आहे. नाशिक शहरातील खासगी फर्मसह सिन्नर तालुक्यातील एका सहकारी संस्थेचा यात समावेश आहे.
हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका
हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!