आश्चर्यच! अख्ख गावचं गुलाबी; काय आहे महाराष्ट्रातील पहिल्या गुलाबी गावाचं गुलाबी गुपित? 

नाशिक : आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे जयपूरची पिंकसिटी! पण अशीच पिंक सिटी महाराष्ट्रात असेल तर...होय खरचं असेच मन मोहून घेणारे गाव नाशिक जिल्ह्यात आहे.  विशेष म्हणजे या  गावाला भेट देण्याचा मोह खुद्द राज्यपालांना देखील आवरलेला नाही. नेमकं काय गुपित आहे  गुलाबी गावाचं गुलाबी गुपित? 

नेमकं काय गुपित आहे  गुलाबी गावाचं गुलाबी गुपित? 

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यात भिंतघर नावाचं अतिदुर्गम डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं  हे टुमदार गाव....तिथे तुम्ही भेट द्यायला गेलात तर खरचं तुमचं असं तुमचं गुलाबी स्वागत होतं. कि तुम्ही या गावाच्या प्रेमातच पडाल.  या गावाने असं काही करुन दाखवलंय, की खुद्द राज्यपालांनी या गावाला भेट दिलीये. गावात राज्यपाल येताच त्यांचं इथल्या महिला भगिनींनी औक्षण आणि आदिवासी पारंपारीक नृत्य करत स्वागत केलं होतं. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील हे गाव. आता भिंतघर ऐवजी गुलाबी गाव म्हणून नावारुपास आलंय. 

May be an image of tree, sky and grass

महिलांचा आदर वाढावा म्हणून गुलाबी गावाची कल्पना

या गावाचे रुप पालटले ते शिक्षक जितेंद्र गवळी यांनी. या गावातल्या बर-याचशा मुली शिकत नव्हत्या. गवळी यांनी घराघरात जाऊन शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितले. आणि मुलींची शाळेतली हजेरी वाढली. मुलींनी शिकावं आणि गावात महिलांचा आदर वाढावा म्हणून गुलाबी गावाची कल्पना पुढे आली. गावाने सुध्दा गुरुजींना साथ दिली. आणि पाहता पाहता गावातली सगळी घरं गुलाबी झाली. 

May be an image of 2 people, people sitting and outdoors

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

गावकऱ्यांच्या एकाकीतून हे गुलाबी गाव उभे 

जवळपास ८० कुटुंबं आणि ४०० लोकसंख्या असलेलं हे भिंतघर राज्यातलं पहिलं गुलाबी गाव ठरले आहे. गावात नीटनेटके रस्ते, एक घर एक झाड. प्रत्येक घरासमोर पक्षांसाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात दारूबंदीही करण्यात आली आहेत. पूर्वी हे गाव हिरमाळ म्हणून ओळखले जायचे. एकाने दगडाची भिंत बांधली. त्यामुळे गावाचे नाव भिंतघर नाव गावकऱ्यांच्या एकाकीतून हे गुलाबी गाव उभे राहिले. या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. 

May be an image of outdoors

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

इतर गावांनीही अशीच गुलाबी प्रेरणा नक्की घ्यावी
सुरगाण्याच्या अतिदुर्गम भागात एक गुलाबी गाव उभे राहू शकते आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेतला तर विकासही होऊ शकतो. हे भिंतघरमध्ये आल्यावर त्याची अनुभूती आपल्याला पटते. भिंतघरने करुन दाखवले. इतर गावांनीही अशीच गुलाबी प्रेरणा नक्की घ्यावी असेच या निमित्ताने सांगावेसे वाटते