येवला (जि.नाशिक) : आजकाल या जगात काय घडेल याचा काही नेम सांगता येत नाही. येवला तालुक्यात तर रातोरात अशी घटना घडली. ज्यामुळे नागरिकांत आश्यर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रात्रीस खेळ चाले! नायगव्हाणला पाझर तलावात घडली अनोखी घटना
नायगव्हाणच्या पाझर तलावातून अचानक मासेच गायब झाले आहेत. दरम्यान काही कामानिमित्त इथले मत्स्यव्यवसायिक बाहेरगावी गेले होते. त्यावेळी तलावाच्या घटनास्थळी देशी दारुच्या बाटल्या, मासे पकडण्यासाठी वापरले जाणारे तुटलेले जाळे तलावाच्या ठिकाणी आढळून आले. त्यामुळे हे बघून प्रशांत पानपाटील यांना वेगळाच संशय आला. त्यांनी मासेमारी करणाऱ्यांना बोलावुन घेतले व पाझर तलावातुन मासे पकडण्यासाठी सांगितले असता १२ वाजेपासुन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मासे पकडण्यासाठी प्रयत्न चालू केला. पण त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.
टोळीच तालुक्यात सक्रिय
त्यांच्या जाळ्याला एक ही मासा लागला नाही. यावरुन स्पष्ट झाले कि पाझर तलावातील मासे पूर्णपणे गायब केले आहे. हे एका व्यक्तीचे काम नसून मासे चोरी करणारी टोळीच तालुक्यात सक्रिय आहे हे लक्षात आले आहे.या चोरीमुळे मत्सव्यावसायिकांना ३ ते ४ लाख रूपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे पारखे यांना माहिती कळवली असल्याची माहिती प्रशांत पानपाटील यांनी दिली.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
विशेष म्हणजे माशांना मोठी मागणी; दोन युवकांना मोठा भुर्दंड
या माशाचा आकार अर्धा ते एक किलोदरम्यान झाला होता. नायगव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मत्स्यव्यवसाय करण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी पाझर तलावांचे लिलाव करण्यात आले होते.नायगव्हाण येथील प्रशांत पानपाटील व सम्राट पानपाटील यांनी हा लिलाव घेतला होता. विशेष म्हणजे माशांना मोठी मागणी असल्याने व तलावात पाणीही टिकणार असल्याने चांगला व्यवसाय होईल या हेतूने त्यामध्ये रोहु, मिरगळ, कटला, कोबडा, जातीचे असे ४४१ मत्सबिजाचे डब्बे सोडले होते. यासाठी या युवकांनी २ लाखावर भांडवलाची गुंतवणूक करुन मत्स्यव्यवसाय सुरू केला होता.
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा