अमित ठाकरे www.pudhari.news

Ekadashi Ashadi Vari | मनसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळाच्या तयारीचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार असून, त्यासाठी ते दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. तत्पूर्वी मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे बुधवारी (दि. १९) नाशिकमध्ये – सायंकाळी दाखल होत असल्याने, कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी (दि.२०) होणार आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरेही पालखी सोहळ्याला उपस्थिती दर्शवतील, पालखीची पूजा करून काही वेळ ते वारीत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा: