आ. एकनाथ खडसे : शिंदे सरकारला सत्ता मिळाली मात्र रामराज्य दूरच

एकनाथ खडसे,www.pudhari.news

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र ते अद्यापही रामराज्य आणू शकले नाहीत, असे खडसे म्हणाले आहेत.

दिवाळीच्या दिवशी श्रीरामाने रावणावर विजय मिळवला. ते विजय मिळवून परत आले होते. एकीकडे श्रीरामाने याच कालावधीत विजय संपादन केला होता. दुसरीकडे महाराष्ट्रातही शिंदे यांनी विजय संपादन केला आहे. मात्र श्रीराम यांनी जे रामराज्य आणले. ते रामराज्य आणण्यात शिंदे सरकार कमी पडत आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून भीषण चित्र निर्माण झाले आहे. या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. सर्वच क्षेत्रात महागाईने उचांक गाठला आहे. सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. शिंदे सरकार आश्वासन देत आहेत. मात्र कृतीत काहीही उतर नसल्याचे दिसत आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. दरवर्षी दिवाळी येते. हा सण आपण उत्साहाने साजरा करतो. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. महागाईचे चटके जाणवत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील आहे, अशी खंतही खडसे यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा:

The post आ. एकनाथ खडसे : शिंदे सरकारला सत्ता मिळाली मात्र रामराज्य दूरच appeared first on पुढारी.