Site icon

आ. रवि राणांचा निषेध : प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देवळा येथे ‘जोडे मारो’

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या आमदार रवि राणा यांच्या विरोधात रविवारी (दि.30) प्रहार शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

आमदार रवि राणा यांनी दिव्यांग तसेच शेतकर्‍यांचे नेते, प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात खालच्या पातळीवर आक्षेपार्ह बेताल वक्तव्याच्या विरोधात येथील प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, कार्याध्यक्ष दशरथ पूरकर, तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, उपतालुकाध्यक्ष हरीसिंग ठोके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, शेतकरी नेते कुबेर जाधव, व्यंगचित्रकार किरण मोरे, युवा तालुकाध्यक्ष बापू देवरे, जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, अपंग क्रांती तालुकाध्यक्ष अर्जुन देवरे, उपतालुकाध्यक्ष बाळू बैरागी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनिता देसले, देवपूरपाडे येथील यमुनाबाई अहिरे, मंगल वाघ, रंजना शिरसाठ, तालुका संघटक माधव शिरसाठ, पोपट मोरे, किरण सोनवणे, सुनील पगार, कैलास कोकरे, केदा चव्हाण, सुपडू चव्हाण, आनंदा चव्हाण, रामदास अहिरराव, बाळू वाघ, मुकुंद चव्हाण, सुभाष काळे, पंकज सूर्यवंशी आदींसह कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा:

The post आ. रवि राणांचा निषेध : प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देवळा येथे ‘जोडे मारो’ appeared first on पुढारी.

Exit mobile version