इगतपुरीच्या रेन फॉरेस्ट रिसॉर्टच्या व्यवस्थापकाकडून तरुणीचा विनयभंग; रिसॉर्ट सतत वादाच्या भोवऱ्यात

इगतपुरी (नाशिक) : इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टचा व्यवस्थापकाने मंगळवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास रिसॉर्टमधील एका २२ वर्षीय तरुणीला, ‘तुझी तब्येत बिघडली आहे. मी तुला पाहायला येतो’, असे सांगत जबरदस्ती तरुणीच्या खोलीत प्रवेश केला. 

‘तुझी तब्येत बिघडली आहे. मी तुला पाहायला येतो’,
रेन फॉरेस्ट रिसॉर्टचा व्यवस्थापक मनीष परमचंद जैन याने मंगळवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास रिसॉर्टमधील एका २२ वर्षीय तरुणीला, ‘तुझी तब्येत बिघडली आहे. मी तुला पाहायला येतो’, असे सांगत जबरदस्ती तरुणीच्या खोलीत प्रवेश केला. तरुणीचा हात पकडून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने इगतपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात अडथळा आणल्याप्रकरणी मनीष जैन याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचारी आर. बी. कोळी तपास करीत आहेत. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

दोन वर्षांपूर्वी छापा

दरम्यान, रेन फॉरेस्ट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. दोन वर्षांपूर्वी रेन फॉरेस्ट हॉटेलातील रेव्ह पार्टीवर इगतपुरी पोलिसांनी रात्री छापा टाकून अर्थनग्न व मद्यधुंद अवस्थेत अनेक तरुणी व तरुणांना अटक केली होती.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

शासकीय आदेशाला केराची टोपली

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली होती. शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून रेन फॉरेस्टच्या हॉटेल प्रशासनाने जून २०२० मध्ये हॉटेल सर्रासपणे सुरू ठेवून लग्नासाठी हॉटेल भाड्याने दिले होते. त्या वेळीही याची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी चौकशी करून तेथे छापा टाकला होता.  

न्यायालीन कोठडी

तरुणीचा विनयभंग व पोलिसांच्या तपासात अडथळा आणल्याप्रकरणी बलायदुरी (ता. इगतपुरी) येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टचा व्यवस्थापक मनीष परमचंद जैन याच्याविरोधात ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालीन कोठडी सुनविण्यात आली.