इव्हिनिंग वॉक बेतला जीवावर! विचित्र अपघातात माजी मुख्यध्यापकांचा मृत्यू; CCTV मध्ये थरार कैद

सटाणा (जि.नाशिक) : चालण्याचा व्यायाम केल्यास आपल्या आरोग्याला कित्येक लाभ मिळतात हे सर्वांनाच माहित आहे. पण हाच इविनिंग वॉक एका दाम्पत्याच्या जीवावर बेतला आहे. एका विचित्र अपघाताने क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. हा सर्व प्रकार एका cctv कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

CCTV मध्ये थरार कैद
बुधवार (ता.३) रोजी सायंकाळी नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरालगत मुख्याध्यापक अशोक काशीराम अहिरे (वय ६८)  हे पत्नी लता अहिरे यांच्यासोबत इव्हीनिंग वॉकला जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली.

 

या अपघातात (कै.) अहिरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर त्यांच्या पत्नी लताबाई यादेखील गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनेनंतर अहिरे दाम्पत्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

सर्वत्र हळहळ व्यक्त

अहिरे यांनी मविप्र संस्थेत जवळपास ३२ वर्षे सेवा केली. गणित आणि विज्ञान विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. करंजाड (ता.बागलाण) येथील कॉम्रेड उदाराम देवरे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आराई (ता.बागलाण) येथील मूळ रहिवासी आणि मविप्र संस्थेतील निवृत्त मुख्याध्यापक अशोक काशीराम अहिरे म्हणजेच सर्वश्रृत असलेले अहिरे सर यांचे आज गुरुवार (ता.४) रोजी पहाटे नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

येत्या दोन दिवसात अंत्यसंस्कार
अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थायिक असलेले अभिजीत अहिरे व चेतन अहिरे यांचे ते वडील होत. दोन्ही मुले अमेरिकेतून परतल्यावर येत्या दोन दिवसात त्यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.