उकळत्या तेलात हात घालून महिलेची चारित्र्य पडताळणी पडली महागात! गुन्हा दाखल

नाशिक :  महिलेचा छळ करण्याचा अमानुष प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला. पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून जात पंचायतीने तेलाला उकळी आल्यावर नवऱ्याने पाच रुपयांचे नाणे त्या तेलात टाकले होते.

महिलेची चारित्र्य पडताळणी पडली महागात

जात पंचायतीचे अघोरी व अन्यायी न्यायनिवाडे व शिक्षेच्या प्रकारात महिला छळ करण्याचा अमानुष प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला. पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून जात पंचायतीने तेलाला उकळी आल्यावर नवऱ्याने पाच रुपयांचे नाणे त्या तेलात टाकले. महिलेला रिकाम्या हाताने नाणे बाहेर काढण्यास सांगितले. महिलेने खूप विरोध करूनही पतीने तिचे चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती केली.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

अमानवीय प्रकाराची चौकशी

उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही, तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते व हात भाजला, तर चारित्र्य शुद्ध नाही, असे समजले जाते. अशा अमानुष न्यायनिवाड्याचा अमानवीय प्रकाराच्या चौकशीची जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली होती. ‘सकाळ’मध्ये बातमी आल्यावर सोमवारी या प्रकरणी सोलापूरला गुन्हा नोंदविण्यात आला.  

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

सोलापूरला गुन्हा नोंद

उकळत्या तेलात हात घालून नाणे काढून समाजातील जात पंचायतीसमोर स्वतःच्या चारित्र्याची परीक्षा देण्याच्या अमानवीय प्रथेबाबत ‘सकाळ’मध्ये आलेल्या वृत्ताची दखल घेत सोलापूर पोलिसांत सोमवारी (ता.२२) गुन्हा नोंदविण्यात आला.