उत्तर महाराष्ट्रातील पहिले ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर नाशिकमध्ये मंजूर 

नाशिक : नाशिकमधील जखमी वन्यप्राण्यांची उपचारासाठी पुण्यातील कात्रजमधील उपचार केंद्रात रवानगी करावी लागते. बिबट्यांना उपचारासाठी बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात पाठवले जाते. प्रवासात वन्यप्राण्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जखमी वन्यप्राण्यांवर नाशिकमध्ये उपचार व्हायला हवेत, अशा आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. अखेर उत्तर महाराष्ट्रातील पहिले ‘ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’ नाशिकमध्ये मंजूर झाले. नाशिकमध्ये वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी अपंगालय व उपचार केंद्र उभारण्यासाठी काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. 

जखमी वन्यप्राण्यांना मिळणार उपचार;
विविध घटनांमध्ये २०२०-२१ मध्ये २८ बिबट्यांना रेस्क्यू करण्यात आले. त्यापैकी सात बिबट्यांना उपचार व संगोपनासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले. रेस्क्यू केलेल्या २१ कासवांपैकी वडोदरामध्ये पाच आणि कात्रजमध्ये सहा कासवांना उपचारासाठी पाठवण्यात आले. रेस्क्यू केलेले दोन कोल्हे, एका माकडाला कात्रजला रवाना करण्यात आले होते. अशा परिस्थितीत १९९८ पासून नाशिकमध्ये वन्यप्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी अपंगालय व उपचार केंद्र उभारण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

बांधकाम विभागाकडे काम सुपूर्द 

पश्‍चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या समन्वयातून नाशिकमध्ये उपचार केंद्र उभारण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. श्री. गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी केंद्राचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

पाच कोटींचा निधी 
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच श्री. मांढरे यांनी कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. म्हसरूळ येथील वन विभागाच्या परिसरात हे सेंटर होणार असून, बिबट्या, तरस, लांडगे आणि इतर वन्यप्राण्यांच्या उपचारासह अद्ययावत मोठे पिंजरे बनविले जाणार आहेत. नाशिकमधून अनेक वर्षांपासून सर्पमित्र, प्राणीमित्र, पक्षीमित्र या केंद्राची मागणी करीत होते. जिल्हा नियोजन समितीने पाच कोटी रुपये वन विभागाला दिले आहेत. 

कोट 
फोटो ःNSK21F87652 
नाशिककडे ‘वाइल्ड लाइफ हब' म्हणून पाहिले जाते. उपचार केंद्रामुळे जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करून वेळेत पुन्हा जंगलात सोडता येणार आहे. बिबट्याचे संवर्धन नक्कीच होईल. 
- सुनील वाडेकर (बिबट्यांना रेस्क्यू करणारे वन अधिकारी) 
....