उत्पादन शुल्काच्या नाकावर टिच्चून देशी दारूविक्री! पोलिस, महसूल प्रशासनही अनभिज्ञ 

सिडको (जि.नाशिक) : राज्य सरकार कोरोना संसर्गाची लाट थोपण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे थोड्याशा पैशाच्या लालसेपोटी शहरातील काही दारूचे दुकानदार या ना त्या गैरमार्गाने दुकानातील दारूचा साठा गैरमार्गाने विक्री करत असल्याचे संतापजनक चित्र बघायला मिळत आहे. 

अंबड गावातील प्रकार : पोलिस, महसूल प्रशासनही अनभिज्ञ 
अंबड गावात असंच काहीस विदारक दृश्‍य देशी दारूच्या दुकानाच्या मागील बाजूस सचित्र येथील नागरिकांना रोज बघायला मिळत आहे. दुकानाला समोरून कुलूप लावलेले आहे. मागच्या दाराने रोज दारूचे बॉक्सच्या बॉक्स लंपास होत आहेत. रोज घडणाऱ्या या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी याचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून, तो ‘सकाळ’च्या हाती लागला आहे. राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाला याची खबर लागू नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

दारूचे दुकान बंद आहे. मी आता चाळीसगावला धार्मिक कार्यक्रमासाठी आलो आहे. त्यामुळे दुकानाच्या चाव्या माझ्याकडे आहेत. इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहेत. त्याकडेही बघा. -दत्तू सानप, चालक, देशी दारू दुकान, अंबड, नाशिक (फोटो) 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू