उन्हाळ्याची लागली चाहूल, बहुगुणी नागली खरेदीसाठी महिलांची लगबग; फायदे वाचून व्हाल थक्क

नरकोळ (जि.नाशिक) : उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात पापडासाठी लागणाऱ्या नागली खरेदीसाठी महिलांची वर्दळ सुरू झाली आहे. मार्चमध्ये उन्हाळी पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी सुरू झाली आहे. 

नागली शरीराला पोषक; खरेदीसाठी महिलांची लगबग 
वर्षभर पुरेल इतके पदार्थ महिला बनवितात. नागली शरीराला पोषक आहार आहे. अन्नधान्यातील मुख्य पावसाळी पीक म्हणून याकडे आजही आदिवासी भागात पाहिले जाते. बाजरीइतके महत्त्व नागलीला आहे. आरोग्याच्या दृष्टीने तिच्याकडे पाहिले जाते. नागली पचनास हलकी असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव स्थिर आहेत. सध्या बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील वाठोडा, तताणी, भिकारसोडा, वागरीपाडा भागांतील नागली उत्पादक शहरी भागात विक्रीसाठी येत आहेत. 

असा आहे नागलीचा दर... 
२१० ते २२० पायली (सात किलो) 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

नागलीपासून फायदे... 
नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने, तंतूमय पदार्थ व इतर खनिजे मुबलक आहेत. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तंतूमय पदार्थांचे प्रमाण जास्त आहे. स्निग्ध पदार्थ कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नाचणीच्या सेवनामुळे रक्ताक्षय कमी होण्यास मदत होते. रोजच्या आहारात समावेश केल्यास उच्च रक्तदाब टाळला जाऊ शकतो. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात येते. हाडे मजबूत होतात. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

अतिवृष्टीमुळे यंदा नागली उत्पादन कमी झाले तरी भाव स्थिर आहेत. बाजारात नागली घेण्यासाठी गर्दी होत आहे. हे पीक श्रमाचे झाले आहे. त्यामुळे अनेकजण नागली पीक घेत नाही. 
- सुभाष ठाकरे, वाठोडा (ता. बागलाण)