उन्हाळ कांद्याच्या भावामध्ये झेप! लाल कांद्याच्या भावातही उसळी 

नाशिक : नाशिकप्रमाणे राजस्थान आणि मध्यप्रदेशात कांद्याची आवक कमी राहिल्याने भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत उन्हाळ कांदा अंतीम टप्प्यात पोचला आहे. नवीन लाल कांद्याची आवक मोठ्याप्रमाणात होण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी बाकी आहे.

असा आहे भाव

कांद्याच्या भावातील चढ-उतार मोठ्याप्रमाणात सुरु आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे देशांतर्गत व्यापाऱ्यांकडून कांद्याच्या आगारातील व्यापाऱ्यांकडून कांद्याची फारशी मागणी नसल्याची स्थिती आहे. सोमवारच्या (ता. ७) तुलनेत बुधवारी (ता. ९) उन्हाळ कांद्याच्या क्विंटलच्या सरासरी भावामध्ये एक हजार ते चौदाशे रुपयांची झेप राहिली.

उन्हाळ कांदा अंतीम टप्प्यात

त्याचवेळी नवीन लाल कांद्याच्या भावाने क्विंटलला पावणेदोनशे ते नऊशे रुपयांची उसळली घेतली. नाशिकप्रमाणे राजस्थान आणि मध्यप्रदेशात कांद्याची आवक कमी राहिल्याने भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत उन्हाळ कांदा अंतीम टप्प्यात पोचला आहे. नवीन लाल कांद्याची आवक मोठ्याप्रमाणात होण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी बाकी आहे. नेमकी हीच परिस्थिती हेरुन शेतकऱ्यांनी कांदा कमी प्रमाणात बाजारात आणणे पसंत केल्याचे चित्र दिसते आहे. उन्हाळ कांद्याला आज क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा : (कंसात सोमवारी क्विंटलला मिळालेला सरासरी भाव) : लासलगाव- २ हजार ६०० (दीड हजार), मुंगसे- २ हजार ४०० (२ हजार २५०), चांदवड- २ हजार ९०० (१ हजार ६५०), मनमाड- २ हजार ४५० (१ हजार ७००), पिंपळगाव- २ हजार ८०१ (१ हजार ८५१), देवळा- २ हजार ७२५ (१ हजार ७५०), उमराणे- २ हजार ८०० (१ हजार ४००). राजस्थान आणि मध्यप्रदेशामध्ये आज पाच ते सहा रुपये किलो असा अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

नवीन लाल कांद्याचे भाव 
(क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ बुधवार (ता. ९) सोमवार (ता. ७) 
लासलगाव ३ हजार १०० २ हजार ५०० 
मुंगसे २ हजार ६०० २ हजार ४२५ 
चांदवड ३ हजार २५० २ हजार ७५० 
मनमाड २ हजार ७०० २ हजार ४०० 
देवळा ३ हजार ३२६ २ हजार ४०० 
उमराणे २ हजार ९०० २ हजार 
पिंपळगाव २ हजार ९५१ २ हजार ५०१  

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले