उपनगर पोलिस ठाण्यात क्यूआर कोड वाढवा; नागरिकांची मागणी

नाशिक रोड : उपनगर पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून, २२ झोपडपट्टीच्या हद्दीच्या या पोलिस ठाण्यात क्यूआर कोडची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

उपनगर पोलिस ठाण्यात क्यूआर कोड वाढवा; नागरिकांची मागणी 

गावठी कट्टे सापडणे, तलवारी व्याजाचा धंदा, हाणामाऱ्या, खून, दरोडे यासारख्या गंभीर घटना वाढल्या आहेत. ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बऱ्याच प्रमाणावर झोपड्या असून, बावीस झोपडपट्ट्यांची हद्द असणाऱ्या उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्यूआर कोडची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

जेल रोड, भीमनगर, बेला डिसूझा कॉलनी, आम्रपाली झोपडपट्टीतील जय भवानी रोड, विहितगाव, डोबी मळा, देवळालीगाव, पिंपळगाव खांब येथे गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे क्यूआर कोडची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच