“उपमुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील” – पालकमंत्री भुजबळ

नाशिक : काँग्रेस पक्ष कोणाला प्रदेशाध्यक्ष करते, किंवा कोणाला कुठले पद येते हा सर्वस्‍वी काँग्रेस पक्षाचा विषय आहे. दावा तर मुख्यमंत्री पदासाठीदेखील करता येऊ शकतो. परंतु प्रत्‍यक्षात काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद देण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील तोच अंतीम निर्णय असेल, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.५) व्‍यक्‍त केली. 

इंधनावर केंद्राचाच अधिक कर 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीनंतर झालेल्‍या पत्रकार परीषदेत ते बोलत होते. इंधनदर वाढ व त्‍याविरोधात सुरू असलेल्‍या भाजपच्‍या आंदोलनाबातत प्रश्‍नावर भुजबळ म्‍हणाले, की लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्‍येक नागरिकाचा अधिकार आहे. परंतु राज्‍य सरकारच्‍या तुलनेत केंद्र शासनाकडून इंधनावर जादा प्रमाणात कर आकारला जातो. त्‍यात कपात करुन केंद्र सरकारने नागरीकांना दिलासा द्यावा. 
 
जिल्‍हा बँकेने सामंजस्‍याने घ्यावे 

थकीत कर्जाप्रकरण नोटीस बजावल्‍यानंतर शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या घटनेविषयी ते म्‍हणाले की जिल्‍हा बँकेने सामंजस्‍याने परीस्‍थिती हाताळायला हवी. यापूर्वीच कोरोना काळात शेतकर्यांच्या उत्‍पन्नावर परीणाम झालेला आहे. त्‍यातच नोटीसा व अन्‍य बाबींतून दडपण आणायला नको. यासंदर्भात संबंधित अधिकार्यांना सूचना देणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

..तर सेलिब्रिटीनी शेतकऱ्यांसोबत उभे राहावे 

दिल्‍लीभोवती आंदोलन करणारे शेतकरी हे पाकिस्‍तानातून आलेले नसून, ते भारतीय नागरीकच आहेत. आता आंतरराष्ट्रीय कलावंतांकडून शेतकर्यांची बाजू घेतली जात असल्‍याने हे आंदोलन जागतिक स्‍तरावर पोहोचले आहे. आता एकात्‍मतेचा संदेश देण्यासाठी सेलिब्रिटीज्‌ने आपली नेमकी भूमिका जाहीर करावी. ते शेतकर्यांच्‍या पाठीमागे उभे राहिले तर अन्‍य देशांतील कलावंतांना पुढाकार घेण्याची आवश्‍यकता भासणार नाही. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच