उपसरपंचबाईंचा कारनामा! अधिकाराचा केला गैरवापर, अखेर पद रद्द; इगतपुरी तालुक्यातील घटना

काळुस्ते (नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील प्रकार...शासकीय जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणावरून आडवन येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आशा योगेश शेलार यांचे सदस्यत्व रद्द झाले. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.

जिल्हाधिकऱ्यांकडे लेखी तक्रार

इगतपुरी तालुक्यातील आडवन येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच तथा सदस्य आशा योगेश शेलार यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून या जागेचा वापर करत असल्याची तक्रार गोटीराम लक्ष्मण शेलार या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती व जिल्हाधिकरी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. याबाबतचे सबळ पुरावेही संबंधितांनी सादर केले. अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल होऊन सुनावणी होऊन गोटीराम शेलार यांचा दावा मान्य करत अपर जिल्हाधिकारी नाशिक यांनी आशा योगेश शेलार यांचे आडवन ग्रामपंचायतचे सदस्यत्व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ च्या तरतुदीनुसार रद्द ठरविण्यात आले. अजर्दार गोटीराम शेलार यांच्यावतीने ॲड. सतीश भगत यांनी काम पाहिले.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात