
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज (दि.२२) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.
प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरु होऊन तो ८५ कि.मी. लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा ९७ कि.मी. आहे. या दोन्ही कालव्यातून ६८ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील १८२ गावांना सिंचनाचा लाभ होईल.
हेही वाचा :
- नाशिकहून गोवा, दिल्ली तिकिटावर ‘इतक्या’ रुपयांची सूट
- नगर : दानपेटी फोडण्याचा प्रयत्न फसला
- Nashik 12th Exam : इंग्रजीच्या पेपरला ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची दांडी
The post उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार; ५१७७ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता appeared first on पुढारी.