
नाशिक : पुणे एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी व कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या मातोश्री तत्त्वदर्शी प्रज्ञावंत, नाशिकच्या भूमिकन्या उर्मिला विश्वनाथ कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी (दि.3) नाशिकमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था, जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्था आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदच्या नाशिक शाखा तसेच कुटुंबीय, नातलग, हितचिंतक व मित्र परिवार, नाशिक यांच्या वतीने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी सकाळी 10 वाजता शोकसभा होईल. उर्मिला कराड यांचे नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यातील खोपडी हे माहेर असून, शहरातील एचपीटी महाविद्यालयाच्या त्या आदर्श विद्यार्थी होत. ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याने भारावून गेलेल्या त्या कवयित्री होत. त्यांचे ‘अरे संसार संसार’, ‘पंढरपूर एकादशी’ यांसह सात ते सात कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय ‘माझी माय दुधावरची साय’ या बालकवितांच्या संग्रहाला अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. पुणे येथे स्थायिक असतानाही नाशिकशी त्यांची नाळ घट्ट होती. नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा होत असून, त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हेही वाचा :
- यवतमाळ : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून
- Naagin : एकता कपूरच्या मालिकांतून नागिन बनून रातोरात स्टार झाल्या ‘या’ अभिनेत्री
- नगर : केडगावात तरुणास बेदम मारहाण
The post उर्मिला कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमध्ये उद्या शोकसभा appeared first on पुढारी.