जळगाव : पुढारी वृत्तसेवा– महसूल व राज्य कर्मचारी यांनी जुन्या पेन्शनसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात 100 टक्के कर्मचारी व राजपत्री अधिकारी सहभागी झालेले आहेत. यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात सगळीकडे सामसूम वातावरण आहे. माहे मार्च 2023 मध्ये सरकारी/निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी (जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी) बेमुदत संप आदोलन छेडले होते. तत्समयी मे. शासनाने सदर संपात मध्यस्थी करून संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली. चर्चेत प्राधान्यक्रमावर असलेली “जुनी पेन्शन सर्वांना मंजूर करा” या मागणीबाबत लेखी हमी देऊन दिलासा दिला होता. तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेतले जातील असेही निसंदिग्ध आश्वासन मे. शासनाने संघटनेस दिले होते. त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा या उद्देशाने मे. शासनाने केलेल्या विनंती नुसार संप आदोलन स्थगित केले होते. तरी कोणत्याही मागणी संदर्भात अंतीम ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही. तसेच संपाच्या आदल्यादिवशी 13 डिसेंबर रोजी मा. राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मे. शासनासोबत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने राज्यातील शासकीय कर्मचारी-शिक्षकांचा 14 डिसेंबर पासून बेमुदत संप सुरु झालेला आहे.
संपाच्या पहिल्या दिवशी जळगांव जिल्हयातील जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये महसूल सहायक(200) , अव्व्ल कारकून(192), मंडळ अधिकारी (110), तलाठी (423), शिपाई (133) व वाहन चालक (21) संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपात महसूल विभागाचे 986कर्मचारी संपत सहभागी आहेत.86 राजपत्रित अधिकारी एक दिवसाच्या सामूहिक रजेवर आहेत.65कर्मचारी हजर होते.
तसेच सदर संपास राजपत्रित अधिकारी महासंघ जळगांव व महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनीही समक्ष संपाच्या स्थळी भेट देऊन संपास एक दिवसांचे सामुहिक रजा आंदोलन करुन पाठिंबा दिलेला आहे. संपात खालील कर्मचारी ,अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, तहसिलदार जयश्री माळी, उषाराणी देवगुणे, तहसिलदार पंकज लोखंडे, तहसिलदार शितल राजपूत, नायब तहसिलदार राहुल सोनवणे, नायब तहसिलदार प्रदीप झांबरे, जिल्हा अध्यक्ष योगेश नन्नवरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण बाविस्कर, कोषाध्यक्ष घन:शाम सानप , कार्याध्यक्ष अतुल सानप, सरचिटणीस दिपक चौधरी, रेखा चंदनकर , जागृती पवार, वैशाली पाटील, श्रीदेवी भोपे, परवीन तडवी, पल्लवी खडके, प्राजक्ता वाघ, योगेश पाटील, के.एम पाटील, गणेश हटकर, हेमंत खैरनार, दिनेश उगले, विलास डोंगरे, शैलेश तरसोदे, विलास हरणे, चंद्रकांत कुंभार, ए.पी. कुलकर्णी, किरण लोहार, सुनिल निंबाळकर, गजानन नरोटे, राहुल नवगिरे, नूर शेख, सुरेश महाले, कैलास महाले, उध्दव नन्नवरे, संदीप पाटील, दिपक चौधरी, किरण बाविस्कर, योगेश नन्नवरे उपस्थित होते.
हेही वाचा ;
- Nashik Drought : साहेब, पेरलं ते उगवलं नाही अन् जे उगवलं ते करपून गेलं; शेतकऱ्याने मांडली कैफियत
- Nashik News : शेतकरी पुत्राची दुसऱ्यांदा अधिकारी पदाला गवसणी
- Security Breach In Parliament: रोजंदारी कामगार ते ‘एमफिल’धारक विद्यार्थिनी : जाणून घ्या संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपींविषयी…
The post एकच मिशन जुनी पेन्शन ; महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू appeared first on पुढारी.