
जळगाव: पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात आज (दि.१५) पहिली सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने खडसे यांचा जबाब नोंदवून घेतला.
आमदार खडसे यांनी अब्रू नुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू नुकसान केली, याची सविस्तर माहिती न्यायालयाला सादर केली. न्यायालयाने खडसे यांचे म्हणणे ऐकून घेतले. या खटल्याची आता पुढची सुनावणी सुरू होणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलखतीत खडसे यांना बदनामीकारक शब्द वापरले, असे या याचिकेत म्हटले आहे. यात खडसे यांचा काहीही संबध नसताना हे शब्द वापरून त्यांची बदनामी व अब्रनुकसानी केल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी फौजदारी व अब्रनुकसानीचा दावा खडसे यांनी दाखल केला. या प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. वाय. खंदारे यांच्यासमोर सुनावणी झाली. खडसे यांच्यातर्फे ॲड. अतुल सूर्यवंशी हे काम पाहत आहेत.
हेही वाचा
- मालगाडीवर चढताच बसला धक्का, जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू
- Eknath Khadse : सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली: एकनाथ खडसे
- Maharashtra Politics : शिंदे आता स्टॅन्डबाय मुख्यमंत्री; एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल
The post एकनाथ खडसेंकडून भाजप आमदाराविरोधात अब्रूनुकसानीचा दावा appeared first on पुढारी.