एकनाथ खडसेंना 137 कोटींच्या दंडाची नोटीस

एकनाथ खडसे

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; अवैधरित्या 1 लाख 18 हजार 202.158 ब्रास मुरमाचे व काळ्या दगडाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांच्यासह मंदाकिनी खडसे, रक्षा खडसे यांना 137 कोटीपेक्षा अधिक रकमेचे दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या कारवाई नंतर जिल्ह्यासह राज्यभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे, रक्षा खडसे यांच्यासह इतर जमीन मालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी 6 ऑक्टोबर रोजी ही नोटीस बजावली आहे. त्यानुसार अवैधरित्या   उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य 26 कोटी एक लाख 12 हजार 117 इतकी आहे. यापोटी पाचपट दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.  त्यानुसार 137 कोटी 14 लाख 81 हजार 883 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे.

हेही वाचा :

The post एकनाथ खडसेंना 137 कोटींच्या दंडाची नोटीस appeared first on पुढारी.