एकलहरेतील एक ट्रॉन्सफॉर्मर कार्यान्वित; वीजपुरवठा सुरळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महापारेषणच्या एकलहरेतील ५० मेगावॅटचा क्षमतेचा एक ट्रॉन्सफॉर्मर बुधवारी (दि.१२) सायंकाळी कार्यन्वित करण्यात आला. या टॉन्सफॉर्मरवरुन महावितरणच्या पंचक, एकलहरे व सामनगाव उपकेंद्रांचा व आयएसपी तसेच सीएनपीचा विद्युत पुरवठा सुरळीत केला गेला. त्यामूळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एकलहरे येथील प्रत्येकी ५० मेगावॅट क्षमतेचे तीन ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. त्यामूळे गेल्या दोन दिवसांपासून दसक ते भगूर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड तसेच उपनगरचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यामूळे सामान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. महापारेषणकडून दुरुस्तीचे काम हाती घेताना मंगळवारी (दि.११) सायंकाळी एक ट्रॉन्सफाॅर्मर एकलहरेत पोहचविला. महापारेषणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत बुधवारी सायंकाळी सदरचा ट्रॉन्सफॉर्मर कार्यन्वित केला. त्यामुळे तीन उपकेंद्रावरील तसेच आयएसपी व सीएनपीचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, महापारेषणच्या यंत्रणेने आता उर्वरित दोन्ही ट्रॉन्सफॉर्मरचे काम हाती घेतले आहे. लवकरच ते कार्यान्वित करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील करते. सदरचे दोन्ही ट्रॉन्सफॉर्मर सुरू झाल्यानंतर उर्वरित वीज ग्राहकांना पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. तोपर्यंत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: