एका मिनिटात तब्बल 239 दोरीउड्या, नाशिकच्या सात्विक निरगुडेचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा

परिसरातील सात्विक राहुल निरगुडे या १३ वर्षीय बालकाने एका मिनिटात तब्बल 239 दोरीउड्या मारून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

सात्विकने यापूर्वी एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड व इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डचा पुरस्कार पटकावला आहे. आता त्याने दोरीउड्या या स्पर्धेमध्ये पूर्वीचे २३३ उड्यांचे रेकॉर्ड मोडत एका मिनिटांत २३९ उड्या मारत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले. सात्विकला त्याची आई अश्विनी, वडील राहुल निरगुडे यांच्यासह कुटुंबातील सर्वांनी प्रोत्साहन दिले. त्याच्या या यशाबाबत इस्पॅलियर शाळेचे डायरेक्टर सचिन जोशी, डॉ. मुस्तफा टोपीवाले, फिटनेस कोच विश्वास जमदाडे, डॉ. दीपाली भोसले, कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील, तन्मय कर्णिक, कोल्हापूर येथील प्रणव भोपळे, सचिन माळोदे यांच्यासह सात्विकचे शालेय मित्र वीर व रोहन यांनीही प्रोत्साहन दिले.

हेही वाचा : 

The post एका मिनिटात तब्बल 239 दोरीउड्या, नाशिकच्या सात्विक निरगुडेचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड appeared first on पुढारी.