एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

देवळा (जि.नाशिक) : आहेर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा प्रतिक..पण अचानक तरुण लेकाच्या दुर्दैवी बातमीने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. नियतीचा घाला आला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. 

तेवीस वर्षाचा प्रतीक जागीच ठार

देवळा-नाशिक रस्त्यावरील भावडे फाट्यानजीक देवळ्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने (जीजे ०८- एयू २०३०) नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने प्रतीक आहेर (वय २३) जागीच ठार झाला. प्रतीक एकुलता एक असल्याने त्याच्या मृत्यूने मटाणे गावावर शोककळा पसरली आहे.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद

नाशिक रस्त्यावर भावडे (ता. देवळा) फाट्यानजीक शुक्रवारी (ता.४) दुपारी पाचला भरधाव ट्रकने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. प्रतीक आहेर असे मृताचे नाव आहे. याबाबत देवळा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच