एक घटना आणि अख्ख्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; १८ वर्षाच्या लेकीला गमावले

कोकणगाव (जि.नाशिक) : चौरे कुटुंब हल्ली नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक आहे. पण त्या दिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. नाशिककडून पिंपळगावकडे येत असतानाच एक दुर्दैवी घटना आणि अख्ख्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काय घडले नेमके?

बस थेट कारला येऊन धडकली...

कोकणगाव शिवारातील शनी मंदिर परिसरात नादुरुस्त ट्रक (एम एच १५ बीजे ३३०२) महामार्गावरील पहिल्या लेनवर उभा होता. नाशिककडून पिंपळगावकडे जाणाऱ्या व पाठीमागून भरगाव आलेल्या टाटा टियागो (एम एच ०५ डीएच ९३५७) चालकास ट्रकचा अंदाज न आल्याने थेट उभ्या ट्रकला घासून दुसऱ्या लेनवर येताच पाठीमागून आलेल्या चाळीसगाव डेपोच्या बसचा (एम एच २० बीएल २४१०) धक्का कारला बसल्याने कार थेट बाजूच्या कुपाटीत उलटली.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

चौरे कुटुंबावर नियतीचा घाला

या भीषण अपघातातील कारमधील पोलिस कुटुंबातील मयूरी चौरे हिचा मृत्यू झाला. पंडित चौरे (वय ४७), वैशाली चौरे, (३१), सागर चौरे (२२), चालक संजय बागूल (४२) जखमी झाले. चौरे कुटुंब हल्ली नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा  - नाशिकमध्ये कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळला

चार जण गंभीर; पिंपळगावला उपचार 

कोकणगाव शिवारातील शनी मंदिर परिसरात नाशिककडून पिंपळगाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कार अपघातात मयूरी चौरे (वय १८, बाभूळना, बागलाण) हिचा मृत्यू झाला. कुटुंबातील आई, वडील, भाऊ व चालक असे चौघे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी सर्व बागलाण तालुक्यातील बाभूळना, अलियाबाद येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.