एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

निफाड (जि. नाशिक) : निफाडच्या बाभळी शिवारात सोमवारी (ता.८) लांडोर नेहमीपेक्षा वेगळा आवाज देत होती व तिची बरीच घालमेल अवस्थेत दिसत होती, शोध घेतला असता तिचा जोडीदार मोर एका काटेरी बाभळीच्या झाडावर अडकून पडला असल्याचे दिसून आले, पुढे....

एका विलक्षण प्रेमाचीच चर्चा!

गावातील काही नागरिक रेस्क्यूसाठी निघाले तर लांडोर सर्वात पुढे जणू त्यांना दाखवत होती मोर अडकलेला आहे.  त्यावेळी मोर अडकल्यामुळे झाडांच्या फांद्या तोडून मोराची मुक्तता करण्यात आली. दरम्यान वर्षभरापासून संजीव गिरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कुटुंबीयांनी मोर आणि लांडोर जोडीला दाणापाणी करीत सेवा सुश्रूशा केल्याने आता या जोडीने आपले बस्तान इथेच बसवले असून इथल्या माणसात दोघे मिसळून गेली आहेत. या प्रसंगावरुन मोर आणि लांडोरची जोडी जणू एक दुजे के लिए बनली असल्याचे निदर्शनास आले. तसेच एकामेकांवर जिवापाड प्रेम करणे आणि संकटात जोडीदाराच्या मदतीला धाऊन जाण्याची चर्चा बेरवाडी सावळी शिवारात रंगली आहे

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर
मोर आणि लांडोर पुर्णपणे माणसाळले

गत वर्षभरापूर्वी बेरवाडी सावली शिवारात एक लांडोर जखमी अवस्थेत होता त्याला मदत मिळावी म्हणून मोर यामोठमोठ्या आवाजाने मदत मिळावी म्हणून आर्जव करत होता. यावेळी संजीव गिरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व वनविभागाच्या वतीने मोरावर उपचार केले होते. एक वर्षापूर्वी जखमी मोर व त्याची लांडोर आता पूर्णपणे माणसाळून गेले आहेत, रोज सकाळी आजू बाजू च्या शेतात चारा पाण्यासाठी जातात व ऊन वाढलं की परत संजीव गिरी यांच्या घराकडे सावली झाल्यावर येतात.  

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर