एक हजार रुपयांच्या उधारीवरुन एकाचा खून; घटनेमुळे परिसरात खळबळ

येवला (जि. नाशिक) : कधी कधी किरकोळ वादातून होणारे वाद आयुष्यातून उठवतात. अशीच घटना शनिवारी (ता.२०) पाटोदा येथे घडली असून, केवळ एक हजार रुपयासाठी खून झाल्याची घटना घडली.  खुनाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

तालुक्यातील ठाणगाव येथील संजय रामचंद्र शिंदे (वय ४०) यांच्याकडे पाटोदा येथील अरुण वाळूबा कुऱ्हाडे यांची एक हजाराची उधारी होती. वेळोवेळी मागणी करूनही शिंदे यांनी कुऱ्हाडे यांची उधारी देण्यास टाळाटाळ चालवली होती. उधारीच्या या पैशांवरून शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पाटोदा-दहेगाव रस्त्यावरील हृषीकेश हॉटेलसमोर दोघांमध्ये वादावादी झाले. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या हाणामारीत शिंदे यांना जास्त मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
 

दारूच्या नशेत घडला प्रकार

अधिक माहिती अशी की,  सुमारे दीड वर्षापासून उधार घेतलेले एक हजार रुपये परत दिले नाहीत, या कारणावरून झालेल्या हाणामारीत पाटोदा येथे शनिवारी सकाळी एकाचा खून झाला. याबाबत तालुका पोलिसांत मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. दारूच्या नशेत झालेल्या या खुनाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला बेड्या ठोकल्या. पोलिसपाटील मुजमील चौधरी यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना देऊन जखमीला रुग्णवाहिकेतून पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिंदे यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय शिंदे यांना मृत घोषित केले. तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन संशयित अरुण वाळूबा कुऱ्हाडे यास ताब्यात घेतले.  

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय