‘एचएएल’चा गेल्या वर्षी १० वर्षांत सर्वाधिक व्यवसाय! आलेख राहिलाय उंचावत; करपूर्व नफाही मोठा 

नाशिक : देशातील बेंगळुरू, नाशिक, कोरापूट आणि कानपूर, लखनौ, हैदराबाद, कोरवामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडतर्फे (एचएएल) संरक्षण सामग्रीचे उत्पादन केले जाते. विमाने आणि हेलिकॉप्टर यांना लागणारी इंजिने, संपर्काची साधने, दिशादर्शक साधने, प्रदर्शन यंत्रणा, जलचलित प्रणाली, विजेची उपकरणे आदींची निर्मिती केली जाते. गेल्या दहा वर्षांमध्ये गेल्या वर्षी एचएएलचा सर्वाधिक २१ हजार ४३८ कोटींचा व्यवसाय झाला असून, करपूर्वीचा नफा तीन हजार ९२८ कोटींचा झाला आहे. 

भारतीय संरक्षण सेवांच्या वापरात असलेल्या एकूण हवाई ताफ्यापैकी सुमारे ६१ टक्के विमाने अथवा हेलिकॉप्टर्सचा पुरवठा एचएएलकडून झाला आहे. तसेच संरक्षण दलांच्या एकूण हवाई ताफ्यापैकी ७५ टक्के विमाने आणि हेलिकॉप्टर्सना लागणारे सर्व तंत्रज्ञानविषयक पाठबळ एचएएलकडून दिले जात आहे. 

एचएएलतर्फे निर्मिती होणारी संरक्षण सामग्री 

* लढाऊ विमाने : सुखोई- ३० एम.के.आय., हलक्या वजनाची लढाऊ विमाने, मिग- २१, बायसन, जग्वार. 
* प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी विमाने : किरण एम.के., हॉक. 
* वाहतुकीसाठी वापरली जाणारी विमाने : डीओ-२२८, एच.एस.- ७४८. 
* हेलिकॉप्टर्स : हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, चेतक, चित्ता आदी. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

एचएएलचा व्यवसाय (आकडे कोटी रुपयांमध्ये) 

उत्पादन २०१०-११ २०११-१२ २०१२-१३ २०१३-१४ २०१४-१५ 
महसूल १३ हजार १२४ १४ हजार २११ १४ हजार ३२८ १५ हजार १३५ १५ हजार ७३० 
करापूर्वीचा नफा २ हजार ८३९ ३ हजार ३२८ ३ हजार ४९७ ३ हजार ५७८ ३ हजार १७२ 
उत्पादन २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ २०१८-१९ २०१९-२० 
महसूल १६ हजार ७५८ १७ हजार ९५० १८ हजार ५१९ २० हजार ८ २१ हजार ४३८ 
करापूर्वीचा नफा ३ हजार २०७ ३ हजार ५८३ ३ हजार २४० ३ हजार ७४२ ३ हजार ९२८ 
(केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिलेली माहिती.)

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ