एमपीएससीच्‍या निर्णयामुळे उमेदवारांना भरली धडकी! आगामी काळातील परीक्षा आयोजनाकडे लक्ष 

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्‍यसेवा पूर्व परीक्षा- २०२०च्‍या तारखेत केलेल्‍या बदलानंतर राज्‍यभर तीव्र पडसाद बघायला मिळाले. त्यानंतर शुक्रवारी (ता. १२) परिपत्रक जारी करत येत्या रविवारी (ता.२१) राज्‍य सेवा परीक्षा घेत असल्‍याचे एमपीएससीमार्फत जाहीर केले गेले. मात्र, असे असले तरी आगामी दोन-तीन महिन्यांतील नियोजित परीक्षांमध्ये विशेषतः महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेस प्रविष्ट लाखो विद्यार्थ्यांना धडकी भरली आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी व विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आणू नये, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे. 

एमपीएससीच्‍या निर्णयामुळे उमेदवारांना भरली धडकी 
परीक्षेच्‍या तारखांमध्ये वारंवार होत असलेल्‍या बदलांमुळे उमेदवारांकडून नकारात्‍मक परिणाम बघायला मिळत आहे. एमपीएससीचे हे धोरण दडपण आणणारे असून, ठरलेल्‍या तारखेप्रमाणेच परीक्षा घेणे आवश्‍यक असल्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

आगामी काळातील परीक्षा आयोजनाकडे लक्ष 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, अन्‍य विविध परीक्षांप्रमाणे आवश्‍यक उपाययोजना करताना ही परीक्षा घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे. दरम्‍यान, येत्‍या तीन महिन्‍यांमध्ये तीन मोठ्या परीक्षा नियोजित आहेत. या परीक्षांसाठी राज्‍यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अनिश्‍चिततेमुळे परीक्षेची तयारी करणारे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण बघायला मिळत आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

संयुक्‍त पूर्वपरीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवार 
पोलिस उपनिरीक्षक, राज्‍य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी अशा तीन पदांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा घेतली जाते. गतवर्षीच्‍या वेळापत्रकातील नियोजित परीक्षा ११ एप्रिलला घेणार असल्‍याचे एमपीएससीमार्फत स्‍पष्ट केलेले होते. या परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक असते. अशात वेळापत्रकात बदल न करता, नियोजित तारखेलाच परीक्षा घेण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे. 

आगामी काळात नियोजित महत्त्वाच्‍या परीक्षा 
परीक्षा दिनांक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२० १५ मार्च 
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२० २७ मार्च 
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२० ११ एप्रिल 
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२० ७ जून