ऐकावं ते नवलचं! मास्कवर नवरा-नवरीच्या फोटोने मिळाला रोजगार; नागरिकांची हौस अन् युवकाची जोरात कमाई

येवला (जि.नाशिक) : मास्कवर नागरिकांचे फोटो छापून असे मास्क नागरिकांना वापरण्यासाठी येथील युवकाने उपलब्ध करून दिले आहे. यामुळे नागरिकांची हौस भागत आहेच, पण अनेकजण मास्क घालण्यासाठी प्रवृत्त होत असून या युवकाला रोजगारही मिळाला आहे 

नागरिकांची हौस अन् युवकालाही रोजगार
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही नागरिक मास्क वापराकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, यासाठी मयूर येवले या तरुणाने मास्कवर फोटो छापण्याची अनोखी शक्कल लढवत नागरिकांना मास्क वापरण्यास उद्युक्त केले आहे. सोबतच आपल्या व्यवसायाला नवीन चालनाही दिली आहे. या मास्कवर स्वतःचे फोटो छापले तर नागरिक मास्क घालतील या हेतूने मास्कवर नवरदेव नवरीचा फोटो छापला तर लग्नकार्यात मास्कची विक्री वाढेल, असे वाटल्याने या तरुणाने मास्कवर नवरदेव- नवरीचा फोटो छापला वऱ्हाडी मंडळीही हौशीने हा मास्क घालत आहेत. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

कल्पना कृतीत उतरली अन्.....
कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क वापर करणे गरजेचे असल्याने विविध प्रकारचे मास्क बाजारात दाखल झाले असून अशाच प्रकारे नवरदेव नवरीचे फोटो असलेले मास्क चक्क लग्नामध्ये नवरदेव नवरी तसेच वर पिता- वधू पिता आपल्याच फोटोचे मास्क येवल्यातील लग्न कार्यात घालत असल्याचे दिसत आहे. मयूरला ही कल्पना सुचली अन नागरिक आवडीने मास्क घालतील असे वाटले होते. त्याची ही कल्पना कृतीत उतरली असून त्याच्याकडे अनेक जण येऊन आपल्या स्वतःच्या फोटोचे मास्क तयार करून घेत आहे तर काही नवरदेव- नवरी देखील लग्नात त्याचा फोटो असलेला मास्क घालत आहेत. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

‘नागरिकांनी मास्क घातले पाहिजे याकरता माझ्या डोक्यात कल्पना आली व मास्क वर फोटो छपाई केली तर नागरिक मास्क घालतील, असे वाटल्याने तसा प्रयोग करून पाहिला माझी कल्पनेला प्रतिसाद मिळत आहे.’ - मयूर येवले, मास्क उत्पादक