ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली ‘संक्रांत’; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

चांदवड (नाशिक) : मकरसंक्रांतीचा दिवस. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीवर पतंग उडवतांना वरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संक्रांतीच्या दिवशीच लेकावर ओढावलेल्या संक्रांतीमुळे मातेने एकच हंबरडा फोडला.

अशी आहे घटना

महालक्ष्मीनगर येथे सोहेल ठेकेदाराचे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी ओलाराम नारसिंग सस्ते (वय ३५, रा. धावडा, ता. सेंधवा) व त्यांची पत्नी अन्य मजुरांसह काम करत होते. तर त्यांचा मुलगाअनिल ओलाराम सस्ते (वय ८) हा दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजारच्या अन्य एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या छतावर पतंग उडविण्यासाठी गेलेला होता. खेळण्याच्या नादात अचानक तोल जाऊन तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच अनिलचा मृत्यू झाला.

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

ऐनसंक्रातीच्या सणालाही नीरव शांतता व हळहळ

संक्रांतीच्या दिवशीच लेकावर ओढावलेल्या संक्रांतीमुळे मातेने एकच हंबरडा फोडला. आईचा आक्रोश ऐकून परिसरात ऐनसंक्रातीच्या सणालाही नीरव शांतता पसरली व हळहळ व्यक्त केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?