ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्याने टरबूज फेकले रस्त्यावर, गायींनी मारला ताव 

लासलगाव (जि.नाशिक) : आर्थिक हातभार लागावा म्हणून निफाड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी टरबुजाची लागवड केली. परंतु ऊत्पादनखर्चही निघत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी टरबूज रस्त्यावर फेकून दिली. ऐन उन्हाळ्यात टरबुजांची लाली उतरल्याने मरळगोई (ता. निफाड) शेतकरी हवालदिल झाला आहे. 

मरळगोई येथील शेतकरी हवालदिल, गायींनी मारला ताव 
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत पैसा कमविण्याचा फंडा अनेक शेतकरी आजमावून पाहतात. काहींना फायदा होतो, तर काहींना शेतमाल तोट्यात विक्री करावा लागतो. असेच काहीसे चित्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या राज्यात आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध, तर काही ठिकाणी लॉकडाउनजन्य परिस्थिती झाल्याने याचा परिणाम शेतीमालाच्या दरावर होत आहे.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

टरबुजांच्या दरावर परिणाम

कांद्याच्या घसरगुंडीनंतर टरबुजांच्या दरावर परिणाम झाल्याने उत्पादनखर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरीचा खर्चही निघत नसल्याने निफाड तालुक्यातील मरळगोई येथील एका शेतकऱ्याने टरबूज रस्त्याच्या कडेला फेकून दिले. या टरबुजांवर गायीनी मनसोक्त ताव मारला. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश