ऐन लग्नमंडपातच शिरले पोलिस व महापालिका कर्मचारी! वधू-वर पित्याकडून घेतला चांगलाच ‘आहेर’

सिडको (नाशिक) : हॉटेल ज्यूपिटरमध्ये लग्नसमारंभ सुरू होता. दरम्यान,  लग्नसमारंभ सुरू असल्याचे निदर्शनास आले. आपल्या भावी आयुष्याच्या वाटचालीस मोठ्या हर्षोल्हासात नव्याने सुरवात करणाऱ्या वधू-वरांना लग्नमंडपातच चांगलेच गिफ्ट मिळाले. वाचा काय घडले?

वधू-वर पित्याकडून घेतला चांगलाच ‘आहेर’

मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल ज्यूपिटरमध्ये पोलिस व महापालिका पथकाने संयुक्त कारवाई केली. या वेळी वऱ्हाडी मंडळी घाबरून सैरावैरा पळ काढत असल्याचे दिसून आले. हॉटेल ज्यूपिटरमध्ये लग्नसमारंभ सुरू होता. दरम्यान, सोशल डिस्टन्सचे पालन न करता लग्नसमारंभ सुरू असल्याचे निदर्शनास आले. सिडको महापालिका आणि पोलिसांच्या पथकाने वरपिता व वधूपिता आणि हॉटेलमालकाकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये दंड वसूल केला. या वेळी वऱ्हाडी मंडळींची चांगलीच पळापळ सुरू झाली होती. काही वऱ्हाडी हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर पळाले, तर काहींनी हॉटेलच्या बाहेर असलेल्या एटीएममध्ये लपल्याचे दिसून आले. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांना कारवाई करत चांगलाच दणका दिला जात आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

वधू-वरपित्याला पाच हजारांचा दंड 

आपल्या भावी आयुष्याच्या वाटचालीस मोठ्या हर्षोल्हासात नव्याने सुरवात करणाऱ्या वधू-वरांना लग्नमंडपातच शुभेच्छा देत महापालिका प्रशासनाने वधूपिता व वरपित्याकडून ‘आहेर’ स्वरूपात प्रत्येकी पाच हजार रुपये घेतल्याने उपस्थित वऱ्हाडी मंडळींत चांगलीच खुमासदार चर्चा रंगली होती. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

 

 

Associated Media Ids : CID21B05386, CID21B05387, CID21B05388